Pune : मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे बस चालवत पीएमपीएल बस चालकाने दिली 15 गाड्यांना धडक

एमपीसी न्यूज – पुण्यात मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे बस चालवत पीएमपीएल (Pune) बस चालकाने 15 गाड्यांना धडक दिली .ही घटना आज (रविवार दि. 22 )  सकाळी सेनापती बापट रोडवर असलेल्या वेताळबाबा चौकात घडली.या अपघातामध्ये काही प्रवासी आणि वाहनचालकांना दुखापत झाली असून कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 

India vs New zealand Match : भारतीय संघाचा विजयी प्रवास पुढे चालत राहणार की न्यूझीलंड अडथळा आणणार?

निलेश सावंत असे बस चालकाचे नाव असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याल आला आहे.कोथरूड डेपोची भाडेतत्त्वावरील बस क्रमांक 1133 मार्ग क्रमांक 276/13 चालक क्रमांक 640 निलेश ज्ञानेश्वर सावंत है बस एनडीए गेट ते चिंचवड या मार्गाने जात असताना रत्ना हॉस्पिटल येथे वेडी वाकडी बस चालवली.

यामुळे एका कारला बस घासून गेल्याने कार चालकाने पुढील चौकात विचारणा केली. या घटनेत बस चालक आणि कर ड्रायवर यांच्यात शाब्दिक वाद झाला.

याच कारणावरून बस चालकाने भर चौकात राग मनात धरून रस्त्यावरील वाहनांचा कोणताही विचार न करता, बस अचानक चौकातून पाठीमागे रिव्हर्स घेऊन वाहने उडवली. पुन्हा बस पुढे चौकापर्यंत घेऊन गेला. या सर्व प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये घबराट झाली.

घाबरलेल्या प्रवाशांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. चतुःशृंगी पोलिसांनी बससह चालकाला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ताबडतोब कामावरून कमी केल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.