Pune : महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्रात शहीद पोलिसांना अभिवादन

एमपीसी न्यूज – मागील वर्षभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या (Pune) पोलीस दलातील शहीद अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) पुणे येथील पोलीस हुतात्मा स्मृति स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट वाइस एडमिरल अजय कोच्छर (एव्हिएसएमएनएम), पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, कारागृह पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, बिनतारी संदेश विभाग पुणेचे पोलीस महासंचालक सुनिल रामानंद, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक प्रविण दिक्षीत, राजेंद्र सिंग व अति पोलीस महासंचालक भगवंतराव मोरे यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अपर्ण करून अभिवादन केले.

Pune : मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे बस चालवत पीएमपीएल बस चालकाने दिली 15 गाड्यांना धडक

यावेळी पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, महाराष्ट्र इंटेलिजन्स ॲकेडमीचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेंद्र डहाळे, कारागृह पोलीस महानिरीक्षक जालींदर सुपेकर, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, रंजनकुमार शर्मा, प्रविणकुमार पाटील, अरविंद चावरिया, वसंत परदेशी, पोलीस सह आयुक्त संजय शिंदे, एसआरपी पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख व पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

लडाख येथे 21 ऑक्टोबर 1959 या दिवशी हॉटस्प्रिंग या कडाक्याच्या थंडीच्या ठिकाणी (Pune) सुसज्ज चिनी सैन्याने केंद्रीय निमलष्करी पोलीस दलाच्या 10 शुर शिपायांच्या तुकडीवर पुर्वतयारीनिशी अचानक हल्ला केला. त्यावेळी त्या 10 शूर वीरांनी शत्रुशी निकराने लढत देऊन देशासाठी बलिदान केले. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलावच्यावतीने पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. पोलीस स्मृतीदिनाचे दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाचे ठिकाणी मागील एका वर्षाच्या कालावधीत आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात येते.

गेल्या वर्षभरात 1 सप्टेंबर 2022 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत महाराष्ट्रातील सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन भिकाजी दातिर, पोलीस हवालदार गौरव नथुजी खरवडे, पोलीस हवालदार जयंत विष्णुजी शेरेकर, पोलीस हवालदार विठ्ठल एकनाथ बढ़ने, पोलीस नाईक संजय रंगराव नेटके, पोलीस नाईक अजय बाजीराव चौधरी असे एकूण सहा पोलीस जवान कर्तव्यावर असताना शहीद झाले. शोक कवायतीचे आयोजन करून या वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

शोक कवायतीत पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे लोहमार्ग पोलीस व राज्य राखीव पोलीस बल गट क्र.1 व 2 यांच्याकडील प्रत्येकी एक प्लाटुनने सहभाग घेतला. पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलातील बॅण्डपथकानेही यात सहभाग घेतला. परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक दशरथ हटकर व सेकंड परेड कमांडर, राखीव पोलीस उप-निरीक्षक विठ्ठल मांढरे यांनी परेड कवायतीचे नेतृत्व केले.

वीरगती प्राप्त झालेल्या देशातील पोलीस अधिकारी व पोलीस जवान (सर्व दर्जाचे) असे एकूण 188 जवानांच्या नावाच्या यादीचे वाचन शोक कवायतीचे दरम्यान सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे आणि नंदिनी वाग्यानी यांनी (Pune) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.