Pimpri : भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे भाजप प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार  यांनी ( Pimpri )  चंद्रशेखर बावनकुळे यांना आज पत्राद्वारे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा  देत असत्याचे कळविले आहे.

Pune : महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्रात शहीद पोलिसांना अभिवादन

त्यांनी  चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की,  साहेब नमस्कार , आज खूप जड अंतकरणाने मी हा निर्णय घेत आहे, गेली 40 वर्षे ज्या पक्षात काम केलं, घडलो त्या भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा देत आहे.

गेली अनेक वर्षे राज्यातील मराठा बांधव आरक्षण मागत असताना त्यांना हे सरकार आरक्षण देऊ शकत नाही, समाज अत्यंत आशेने या सरकारकडे पाहत असताना देखील केवळ वेळ काढूपणा सुरू आहे.

त्या सरकारच्या पक्षात शांत बसून राहण्यापेक्षा मी माझ्या भाजपा प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत असून आजपासून ( Pimpri ) मी पक्षापासून मुक्त होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.