Pune : यशवंत देव लिखित सावली कादंबरीचे प्रकाशन

एमपीसी न्यूज  –  साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशन्स, काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे आणि देव परिवार, पुणे यांच्या वतीने ( Pune ) लेखक यशवंत देव लिखित सावली या कादंबरीचा प्रकाशन सोहळा श्रमिक पत्रकार संघाच्या कमिन्स सभागृहामध्ये नुकताच संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अर्थ व सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र शासनाचे मा. सहसंचालक सुभाष थोरात,  उद्घाटक म्हणून राजा उर्फ श्रीनिवास भीमराव बुधिकोट हे उपस्थित होते.  अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक , संत चित्रकार वि. ग. सातपुते ( विगसा) काव्यानंद प्रतिष्ठान चे सचिव विवेकानंद पोटे आदी उपस्थित होते.

Pimpri : राजन लाखे हे तर “बकुळग्रंथकार” – डॉ. न. म. जोशी

कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. अरुणा वेलणकर यांनी यशवंत देव लिखित गणेश वंदना सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्ना अमृतकर आणि सविता कुंजीर यांनी संयुक्तरित्या केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक काव्यानंद प्रतिष्ठान,पुणे चे संस्थापक अध्यक्ष सुनिल खंडेलवाल यांनी केले.

यशवंत देवांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. अरुणा वेलणकर यांनी यशवंत देवांचा साहित्यिक प्रवास उलगडून दाखवला.

काव्यानंद प्रतिष्ठान पुणे च्या वतीने सुनिल खंडेलवाल आणि विवेकानंद पोटे यांनी व राष्ट्रपती पोलीस पुरस्कार विजेते कवी सीताराम नरके यांनी  यशवंत देवांचा शाल, श्रीफळ आणि पुस्तक देऊन सत्कार केला.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधुरी देव, नचिकेत देव, नीता देव, सचिन देव, प्राची देव व मंदार देशपांडे यांचे मोलाचे सहकार्य केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नीता देव  ( Pune ) यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.