Pune : रेल्वेच्या पुणे मंडळाने विकले 18 कोटींचे भंगार

एमपीसे न्यूज – मध्य रेल्वेने ‘शून्य भंगार’ ही मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत (Pune) मध्य रेल्वेच्या सर्व मंडळांमध्ये भंगार विक्री केली जात आहे. त्यातून मध्य रेल्वेला 202.25 कोटी रुपये मिळाले आहेत. तर त्यात पुणे मंडळाचा 18.62 कोटी रुपयांचा सहभाग आहे.

30 एप्रिल ते 10 ऑक्टोबर या कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात भंगार विकण्यात आले आहे. यामध्ये 13,662 मेट्रिक टन रेल, 12 लोकोमोटिव, 174 कोच, 107 वॅगन,भुसावळ मंडळात जामनेर ते पाचोरा सेक्शन दरम्यानची 20 किलोमीटरची नॅरो गेज लाईन अशा भंगार साहित्याचा समावेश आहे.

Chakan : हॉटेल व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवत चौघांची 78 लाख रुपयांची फसवणूक

मागील वर्षी याच कालावधीत 135 कोटी रुपयांचे भंगार विकण्यात (Pune)आले होते. त्यात यावर्षी तब्बल 43.29 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात मध्य रेल्वेने सर्वाधिक भंगारची विक्री केली आहे. रेल्वे मंडळ, वर्कशॉप, कारशेड इत्यादी ठिकाणी असलेले भंगार साहित्य ठराविक वेळेत विक्री केले पाहिजे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

मंडळनिहाय भंगारची विक्री (कोटी रुपयांमध्ये)

भुसावळ मंडळ – 40.65
माटुंगा डेपो – 30.97
मुंबई मंडळ – 30.07
भुसावळ इलेक्ट्रिक लोको शेड डेपो – 19.08
पुणे मंडळ – 18.62
नागपूर मंडळ – 13.90
सोलापूर मंडळ – 13.24
मध्य रेल्वेचे अन्य स्थानकांमधील विक्रीतून – 26,92

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.