Dighi : व्हिडीओ लाईक करण्यास सांगत तरुणाची अडीच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून तरुणाचा (Dighi) विश्वास संपादन करून तसेच धमकी देऊन अडीच लाख रुपये घेत फसवणूक केली. ही घटना 6 जून ते 18 जुलै या कालावधीत आळंदी रोड, दिघी येथे घडली.

मयुरेश मारुती पाटील (वय 28, रा. आळंदी रोड, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7976794975, 8825324975, 9054700329 मोबाईल क्रमांक धारक तसेच इन्स्टाग्राम आयडी धारक, बँक खाते धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Khed : डिव्हायडरला धडकून कंटेनर उलटला, चालकाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादींना व्हाटस अपवरून (Dighi) मेसेज पाठवून टेलिग्रामवर आयडी पाठवून ते व्हिडीओ लाईक करण्यास सांगितले. व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील याचा विश्वास पटविण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्या बँक खात्यात 21 हजार 270 रुपये पाठवून दिले.

त्यानंतर त्यांना प्रीपेड टास्क देऊन त्यांच्याकडून वेगवेगळ्या युपीआय आयडी आणि बँक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादींनी पैसे भरले नाही म्हणून त्यांना खोटे कर्ज दिल्याचे दाखवून त्यांनी कर्ज भरले नाही म्हणून फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांना त्रास देण्याची तसेच नोकरीच्या ठिकाणी कालवून नोकरी घालवण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी दोन लाख 64 हजार रुपये भरले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.