Khed : डिव्हायडरला धडकून कंटेनर उलटला, चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव वेगाने आलेला कंटेनर अचानकपणे ब्रेक दाबल्याने (Khed) डिव्हायडरला धडकून उलटला यामध्ये चालकाचा मृत्यू झाला आहे हा अपघात सोमवारी सकाळी खेड तालुक्यातील भांबोली येथे तळेगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला.

धनाजी दरोगा सोनार शर्मा (वय 35 रा. बिहार) असे मयत चालकाचे नाव आहे. याप्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात कंटेनरचा वाहक सोनू गणपत गोस्वामी (वय 26 रा. बिहार) याने फिर्याद दिली आहे.

Express Way : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर चार दिवस ब्लॉक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व मयत धनाजी हे एम 43 बी एक्स 4378 या कंटेनर वर(Khed) वाहक व चालक म्हणून काम करत होते. सोमवारी भांबोली येथून तळेगाव दाभाडे कडे जाणाऱ्या रस्त्यावर चालक धनाजी याने भरधाव वेगात कंटेनर चालवण्यास सुरुवात केली.

यावेळी कंटेनर हा उजव्या बाजूला घेत असताना तो पलटी होत असल्याचे धनंजय च्या लक्षात आले. यावेळी त्याने कोणताही विचार न करता जोरात ब्रेक दाबला यामुळे गाडी ही उजव्या बाजूस पलटी होऊन थेट दुभाजकला धडकून उलटली. यात धनाजी याचा डोक्याचा चेंदामेंदा झाला व त्याचा जागीच मृत्यू झाला. यावरून महाळुंगे पोलिसांनी मयूर धनंजय याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.