Express Way : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर चार दिवस ब्लॉक

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम (Express Way)अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे.

यासाठी 17 ते 19 आणि 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेत द्रुतगतीमार्गाच्या मुंबई आणि पुणे वाहिनीवर वाहतूक पूर्णत: बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

PMAY : प्रधानमंत्री आवास’च्या लाभार्थींना डिसेंबरपर्यंत ‘ दिवाळी गिफ्ट’

17 ऑक्टोबर रोजी पुणे वाहिनीवरील खंडाळा बोगदा किलोमीटर 47/900 व लोणावळा (Express Way)किलोमीटर 50/100 येथे गॅन्ट्री उभारण्यात येणार आहे. 18 ऑक्टोबर रोजी मुंबई वाहिनीवरील दस्तुरी पोलीस चौकी किलोमीटर 44/800 आणि खालापूर किलोमीटर 33/800, 19 ऑक्टोबर रोजी ढेकू गाव किलोमीटर 37/800 आणि किलोमीटर 37 येथे गॅन्ट्री उभारण्यात येणार आहे.

26 ऑक्टोबर रोजी खंडाळा बोगदा किलोमीटर 47/120 तर खोपोली एक्झीट किलोमीटर 39/900 येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू राहणार आहे. काम पुर्ण झाल्यावर दुपारी एक वाजता सदर वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.