PMAY : प्रधानमंत्री आवास’च्या लाभार्थींना डिसेंबरपर्यंत ‘ दिवाळी गिफ्ट’

एमपीसी न्यूज – पिंपरी आणि आकुर्डी येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सदनिका बांधून (PMAY) पूर्ण झाल्या आहेत. मात्र, ‘लकी ड्रॉ’ न काढल्याने लाभार्थ्यांना अद्याप घरांचा ताबा मिळाला नाही. सुमारे 11 हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यांचे लक्ष या सोडतीकडे आहे. त्यामुळे त्वरीत कार्यवाही करून ‘लकी ड्रॉ’ काढावा, अशी सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले (PMAY) आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘सर्वांसाठी घर’ या संकल्पनेतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘प्रधानमंत्री आवास योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत पिंपरी, आकुर्डीत बांधलेल्या 938 घरांसाठी अर्ज मागविले आहेत. 10 हजार रुपये अनामत रक्कम व 500 रुपये नोंदणी शुल्कासह इच्छुक नागरिकांनी अर्ज केले आहेत. रस्ते आरक्षणामध्ये बाधित झालेल्या नागरिकांसाठी आकुर्डी येथील गृहप्रकल्प राखीव ठेवला होता.

Wakad : शिवीगाळ केल्याने जिवलग मित्राचा खून , खून लपविण्यासाठी मृतदेह नाल्यात फेकला

आकुर्डीत 568 सदनिका आणि पिंपरीत 370 सदनिका एक वर्षापासून बांधून तयार आहेत. मात्र, प्रशासनाने या प्रकल्पांसाठी अद्याप ’लकी ड्रॉ’ राबवलेली नाही. पिंपरीतील सदनिकेसाठी पात्र लाभार्थ्यास सात लाख 92 हजार रुपये, आकुर्डीतील सदनिकेसाठी सात लाख 35 हजार 255 रुपये स्वहिस्सा भरावा लागणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरीतील प्रकल्पासाठी 4 हजार 664 अर्ज, आकुर्डी प्रकल्पासाठी 6 हजार 692अर्ज असे एकूण 10 हजार 113 अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. या अर्जातून 138 लाभार्थीना घर मिळणार आहे.

… तर डिसेंबरअखेर ताबा मिळेल!
‘प्रधानमंत्री आवास’ योजना अर्जाची छाननी करुन तात्काळ ‘लकी ड्रॉ’ काढणे अपेक्षीत आहे. सदर प्रकल्पाचे काम वर्षभरापूर्वीच पूर्ण झाले आहे. त्याची ’लकी ड्रॉ’ लवकर काढल्यास डिसेंबरअखेर सदनिका ताब्यात मिळतील.

लाभार्थीना कर्ज प्रक्रियेसाठीही वेळ लागणार आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षापूर्वी संबंधित लाभार्थी या प्रकल्पामध्ये हक्काच्या घरात स्थलांतरीत होतील, अशी व्यवस्था प्रशासनाने करावी. केंद्र सरकारकडून राबवण्यात आलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, निश्चित लाभार्थ्यापर्यंत योजनेचा लाभ निर्धारित वेळेत मिळाला पाहिजे, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.