Pune : पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे सुलोचना दिदी यांना गीत-शब्द सुमनांजली

एमपीसी न्यूज – कलाकारांचे माहेरघर असलेल्या पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री स्व. सुलोचना दिदी यांना काल (दि.19) सांगीतिक श्रद्धांजली वाहण्यात  (Pune)  आली. पूना गेस्ट हाऊस येथे झालेल्या कार्यक्रमात सुलोचना दिदी यांच्या चित्रपटातील काही मूळ गीते सादर करण्यात आली त्याचबरोबर चित्रपटातील निवडक हळवे प्रसंग व दृष्ये दृकश्राव्य माध्यमातून दाखविण्यात आली. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, आशा काळे, जयमाला ईनामदार, उल्हास पवार, डॉ. न. म. जोशी, मेघराज राजेभोसले यांच्यासह नाट्यचित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकार या प्रसंगी उपस्थित होते.

राजाच्या रंगमहाली’, ‌‘लिंबलोण उतरू कशी’, ‌‘माळ्याच्या मळ्या मंदी..’, ‌‘अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया’,‘अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गाव..’,अशा एकाहून एक प्रसिद्ध गीतांबरोबरच शब्दसुमनांनी श्रद्धांजली वाहात स्व. सुलोचना दिदींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. ‌‘महक’ प्रस्तुत गायिका मनिषा निश्चल यांनी गीते सादर केली. निवेदन ऋचा थत्ते यांचे होते. ‌‘संपूर्ण रामायण’, ‌‘सुखाचे सोबती’, ‌‘देव पावला’, ‌‘साधी माणसं’, ‌‘मराठा तितुका मेळवावा’, ‌‘एकटी’, ‌‘सुहागरात’, ‌‘भाऊबीज’ अशा विविध चित्रपटातील गीते सादर करण्यात आली.

PCMC :  महापालिका श्वान संतती नियमन शस्त्रक्रियेसाठी 100 पिंजरे उभारणार

किशोर सरपोतदार यांनीसुलोचना दिदी यांच्याविषयी बोलताना सांगितले की, सुलोचना दिदींनी आमच्या आजीकडून शिकलेल्या अनेक गोष्टी चित्रपटात भूमिका साकारताना अंगीकारल्या. आमच्या वडिलांना दिदींकडून दर राखीपौर्णिमेला राखी येत असे तर दर वर्षी भाऊबीजेला वडिलांकडून दिदींना भाऊबीज जात असे. दिदींच्या निमित्ताने राजयोग अनुभवल्याच्या आठवणी सरपोतदार यांनी या प्रसंगी सांगितल्या.

ज्येष्ठ अभिनेत्रनृत्यांगना लीला गांधी यांनी सुलोचना दिदी म्हणजे 24 कॅरेट सोने अशा शब्दांत दिदींचे वर्णन करून त्यांच्यासह केलेल्या संत गोरा कुंभार या चित्रपटातील काही आठवणींना उजाळा दिला.

ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी दीदींची झालेली पहिल्या भेटीपासून जानेवारी 2023 पर्यंत त्यांच्याशी असलेल्या संपर्काचा उल्लेख करून ‌‘सतीचे वाण’ या चित्रपटातील त्यांना झालेला देवीरूपी दिदींचा साक्षात्कार वर्णन केला. दिदींसारखे अलौकिक व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.

चारुकाका सरपोतदार, सुलोचना दिदी आणि भालजी पेंढारकर यांनी माझ्या आयुष्याला कलाटणी दिली असा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.

उल्हास पवार म्हणाले, पूना गेस्ट हाऊस या वास्तूत एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित मंडळी ही फक्त दिदी आणि चारुकाकांच्या प्रेमापोटी आलेली आहे, दिदींना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला नाही याची खंत कायम मनात राहिल, असेही ते म्हणाले.

सुलोचना दिदी या चित्रपट महामंडळाच्या माउली होत्या, त्यांनी अनेक कलाकार, पडद्यामागील कलाकार यांना सदैव मदतीचा हात दिला असे मेघराज राजभोसले म्हणाले.

पंडित वसंतराव गाडगीळ यांनी दिदींविषयी आपल्या भावना देववाणीत व्यक्त केल्या. ते म्हणाले,ज्याचे यश जीवंत आहे, कीर्ती रूपाने जी जनमानसात अस्तित्वात आहे ती व्यक्ती अमर असते. दिदी या आजही (Pune) आपल्यातच आहेत. त्या भगवान स्वरूप झाल्या आहेत.

आभार साधना सरपोतदार यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.