PCMC :  महापालिका श्वान संतती नियमन शस्त्रक्रियेसाठी 100 पिंजरे उभारणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) वतीने नेहरूनगर येथील प्राणी सुश्रुषा केंद्रात श्वान संतती नियमन शस्त्रक्रियेसाठी 130 पिंजरे असून दिवसाला 15 ते 20 शस्त्रक्रिया होत आहेत. शस्त्रक्रिया वाढविण्याच्या हेतूने आणखी 100 पिंजरे वाढविण्यात येणार आहेत. तसेच गेल्या दहा महिन्यांत पालिका, कॅनन कंट्रोल ऍण्ड केअर आणि पीपल्स फॉर ऍनिमल्स संस्था (पीएफए) यांच्या संयुक्त विद्यमाने अडीच हजार श्‍वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Today’s Horoscope 20 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्‍या श्‍वानांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. सद्यस्थितीत शहरात सुमारे 80 हजार भटके श्‍वान असल्याचा पशू वैद्यकीय विभागाचा अंदाज आहे. भटक्या श्‍वानांची संख्या आटोक्‍यात रहावी, यासाठी श्वान संतती नियमन शस्त्रक्रिया करणे हाच एकमेव पर्याय आहे.

त्यामुळे पालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाने मादी श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यावर भर दिला आहे. ऑगस्ट 2022 पासून कॅनन कंट्रोल ऍण्ड केअर आणि पीपल्स फॉर ऍनिमल्स संस्था (पीएफए) यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार 499 श्‍वानांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

श्वान संतती नियमन शस्त्रक्रियेच्या युनिटमध्ये 130 पिंजरे आहेत. पिंजऱ्यांची संख्या 130  इतकी झाली आहे. शहरातील भटक्‍या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी आणखी किमान 100 पिंजरे गरजेचे आहेत.

प्रतिदिन 50 नसबंदी शस्त्रक्रिया होणे आवश्‍यक आहे. यासाठी  पिंजरे तयार केले जाणार असून त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी (PCMC)  दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.