Pune : पुष्प प्रदर्शनात हरवले पुणेकर; पुष्प प्रदर्शनाने बहरले पुण्यातील एम्प्रेस गार्डन

आजचा शुवटचा दिवस

एमपीसी न्यूज : एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्यावतीने (Pune)आयोजित एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो बड्स एन ब्लूम्स-2024 प्रदर्शनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या फुलाच्या मेजवाणीत पुणेकर हरवून गेले. तसेच अनेक नागरीक फुलांसोबत आपला सेल्फी काढण्यात मग्न दिसले.

26 जानेवारी निमित्त असल्याने एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो पाहण्यासाठी पुणेकरांसोबत महाराष्ट्रातील अनेक भागतून लोकांनी गर्दी केली होती. एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो बड्स एन ब्लूम्स-2024 प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

 

Pimple Gurav : मालकाकडून गाडी व चावी घेवून केली मालकाच्याच घरात चोरी, गाडीसह दागिने घेवून कामगार पसार

 

प्रदर्शनात कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीममधून विक्रेते (Pune)आले आहेत जेथे नागरिक गर्दी करित आहे. यामध्ये नर्सरी, शेतीची अवजारे, खते, कुंड्या, बागकामाचे साहित्य, खाद्यपदार्थ असे विविध स्टॉल आहेत. तसेच हुर्डा स्पेशल भेळ वर नागरीक ताव मारत होते. यावर्षी जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साई वृक्षांचे विविध प्रकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.

 

विविध झाडे, वेली नटलेले एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने फुललेली बहरलेले असून याचा आनंद आनंद पुणेकरांनी घेतला. पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इ. ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्पप्रदर्शना मध्ये सहभागी झाले आहेत. या पुष्पप्रदर्शनाचे वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बागेच्या प्रतिकृती आदी गोष्टींचा समावेश असतो.

पुष्प प्रदर्शन दि. 25 जानेवारीला सुरु झाले असून 28 जानेवारी 2024 पर्यंत नागरिकंना पाहता येणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.