Pimple Gurav : मालकाकडून गाडी व चावी घेवून केली मालकाच्याच घरात चोरी, गाडीसह दागिने घेवून कामगार पसार

एमपीसी न्यूज – विश्वासाचा फायदा घेवून कामगाराने मालकाकडूनच(Pimple Gurav) गाडी व चावी घेत मालकाच्याच घरात तब्बल 3 लाख रुपयांची चोरी करत मालकाच्याच दुचाकी वरून पसार झाला आहे. ही चोरी बुधवारी (दि.24) दुपारी पिंपळे गुरव येथे घडली आहे.

याप्रकऱणी संदिप प्रकाश जाधव (वय 40 रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सागर सुभाष काडे (वय 26 रा. पालघर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alandi : एमपीसी न्यूजच्या बातमीची दखल; आळंदी शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या (Pimple Gurav)विश्वासाचा फायदा घेऊन आरोपीने फिर्यादीच्या मोपेड ची चावी घेतली. गाडी घेऊन तो फिर्यादी यांच्या ओळखीचे प्रविण पाटील यांच्याकडे गेला. त्याला पाटील यांच्याकडे फिर्यादीच्या घराची चावी असल्याचे माहिती होते. त्याने पाटील यांच्याकडून चावी घेतली.

चावी घेऊन ते फिर्यादीच्या घरी गेला व त्याने फिर्यादीच्या कपाटातून डब्यातून 3 लाख 23 हजार 415 रुपयांचे सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरली व मालकाच्याच 25 हजार रुपयांच्या दुचाकीवरून आरोपी पसार झाला. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.