Pimpri : प्रज्वल पवार याची शालेय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत निवड

एमपीसी न्यूज – प्रज्वल पवार याची शालेय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत निवड (Pimpri)झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला.

स्कूल गेम ऑफ फेडरेशन इंडिया यांच्या मार्फत पटना, बिहार येथे दिनांक 16 जानेवारी ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत आयोजित केलेल्या 67 व्या राष्ट्रीय स्कूल गेम स्पर्धेत महाराष्ट्र संघात 17 वर्षाखालील गटात प्रज्वल याची निवड झाली आहे.

Talegaon : मुलाच्या लग्न सोहळ्यातून वरमाईचे पावणे पाच लाखांचे दागिने व रोख रक्कम चोरीला

या पाश्र्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे (Pimpri )अध्यक्ष जगदीश शेट्टी यांच्या हस्ते प्रज्वल पवार याचा सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजू कोतवाल, खजिनदार संजय शिंदे, विजय कोतवाल, प्रकाश पवार आदी उपस्थित होते .

प्रज्वल पवार हा खेळाडू राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, पुणे येथे शिकत असून अल्फा क्रिकेट अकॅडमी वाल्हेकर वाडी येथे प्रशिक्षक राजू कोतवाल यांच्याकडे क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.