Pune : रिदम वाघोलीकर आणि रचना शहा ‘महाराष्ट्र अचिवर्स : वर्ड स्मिथ ऑफ द इयर 2019’ ने सन्मानित

एमपीसी न्यूज- संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्मित्त्वांवर तसेच तृतीयपंथी गौरी सावंत यांच्यावर लेखन करणारे युवा लेखक रिदम वाघोलीकर यांना ‘महाराष्ट्र अचिव्हर्स अ‍ॅवॉर्ड 2019 च्या ‘वर्ड स्मिथ ऑफ द इयर’ ने गौरविण्यात आले. बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि संजना गलराणी (भारतीय मॉडेल आणि चित्रपट अभिनेत्री) यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

रिदम वाघोलीकर आणि रचना खडीकर शहा यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत. जगातील एकमेव अनोख्या ग्रामोफोन आकारातील लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तक, किशोरीताईंवरील ‘स्वरमंङळ’ (इंडियन हार्प) आकारातील पुस्तक आणि तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांचा जीवन प्रवास उलगडणारे ‘गौरी -द अर्ज टू फ्लाय’पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून फार कमी वयात प्राप्त केलेल्या लोकप्रियतेमुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

सिनेमा, क्रिडा, उद्योग-व्यवसाय, वैद्यकीय, कला क्षेत्रात महाराष्ट्राचा अभिमान वाढविण्याचे उत्कृष्ठ कार्य करणार्‍यांना ‘महाराष्ट्र अचिव्हर्स अ‍ॅवॉर्ड देऊन पुरस्कृत करणे हे या सन्मानाचे उद्दीष्ट आहे.

या कार्यक्रमात रिदम वाघोलीकर यांच्या समवेत अभिनेत्री अलिआ भट्ट, राणी मुखर्जी, दिग्दर्शक एकता कपूर, संगीतकार बप्पी लहरी, अभिनेता विकी कौशल, क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि केदार जाधव यांना देखील गौरविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.