Nigadi: दृष्टी कम्युनिकेशनच्या वतीने निगडीत स्वरानुष्का सांस्कृतिक मेजवानी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची सांस्कृतिक ओळख वाढावी आणि रसिकांना दर्जेदार सांगीतिक कार्यक्रमांचा आनंद लुटता यावा, म्हणून दृष्टी कम्युनिकेशन अँड मार्केटिंग या संस्थेच्या वतीने एक अभिनव उपक्रम सुरू करीत आहोत. स्वरानुष्का योजनाया योजने अंतर्गत रसिकांना चार कार्यक्रमांची मेजवानी देणार आहोत.

निगडी येथील मनोहर वाढोकार सभागृहात प्रथम पुष्प दि. 5 एप्रिलला सायंकाळी पाच वाजता या सांस्कृतिक मेजवानीचा आनंद लुटता येणार आहे. सुप्रसिद्ध गायिका, निवेदिका, संगीतकार धनश्री गणात्रा आणि त्यांचे सहकारी मराठी गाणी सादर करणार आहेत. तर, मराठी कवितांचा प्रवास अर्थात विंदा ते सौमित्र उलगडून दाखवणार आहेत.

  • हा कार्यक्रम आपल्या नववर्षाच्या सुरुवातीच्या पूर्वसंध्येच्या निमित्ताने आयोजित केला आहे. या उपक्रमाला अनेक स्थानिक नामवंत संस्थांनी पाठिंबा दिला आहे. जागृती महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, भजन महासंघ, मधुश्री कलाविष्कार, अनुष्का स्त्री मंच, स्वरशांती भक्ती मंडळ आदींनी दिला आहे.

दिनांक 5 एप्रिलच्या कार्यक्रमाला पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे व्यवस्थापक समीर परांजपे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्यामसुंदर परदेशी, उपाध्यक्ष सुभाष जोशी, स्वा. सावरकर मंडळाचे सहसचिव प्रदीप पाटील, भजन महासंघाच्या उपाध्यक्ष माधुरी ओक लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. श्रीकृष्ण जोशी ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या निवृत्त मराठीच्या अध्यापिका सुहासिनी पानसे आदी उपस्थित राहणार आहेत.

  • हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे, अशी माहिती उपक्रमाच्या संयोजिका शर्मिला महाजन यांनी दिली. ज्योती कानेटकर आणि वृंदा गोसावी हे उपक्रमाच्या संयोजिका आहेत. यासाठी अधिक माहितीसाठी 7769981557/ 9921775198/ 9822170118 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.