Moshi: पैशावरून पतीचा पत्नीवर चाकूने वार; पतीविरोधात पत्नीची पोलिसात फिर्याद

एमपीसी न्यूज – गावाला जाण्यासाठी पतीने पत्नीकडे पैसे मागितले. यावेळी पत्नीने अडकवलेल्या बॅगेतून हाताने पैसे घेण्यास सांगितल्याने याचा राग आल्याने पतीने तिच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. सोमवारी (दि.२५) सकाळी साडेसहाच्या सुमारास मोशी आदर्शनगर परिसरात ही घटना घडली.

याप्रकरणी वीस वर्षीय पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती देवीदास गंगाराम गांगुर्डे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत मिळालेली माहिती अशी, आरोपी आणि फिर्यादी हे पती-पत्नी आहेत. सोमवारी सकाळी गांगुर्डे यांना गावी जायचे असल्याने त्यांनी पत्नीकडे पैसे मागितले. फिर्यादी या झोपेत असल्याने त्यांनी रॅकला अडकवलेल्या पिशवीतून पैसे घ्या, असे पतीला सांगितले.

याचा राग अल्याने पतीने घरातील चाकू घेऊन पत्नीवर धावून आला आणि हातावर तसेच मानेवर वार करून जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.