Pune : युवा लेखक-र्‍हीदम वाघोलीकर यांना ब्रिटिश पार्लिमेंट चा ‘महात्मा गांधी सन्मान’

इंग्लंडच्या 'हाऊस ऑफ कॉमन्स' मध्ये होणार गौरव

एमपीसी न्यूज- युवा लेखक र्‍हीदम वाघोलीकर यांना ‘ग्लोबल अचिव्हर्स कॉनक्लेव्ह’ च्या वतीने ‘महात्मा गांधी सन्मान’ जाहीर झाला आहे. ‘एनआरआय वेल्फेअर सोसायटी ऑफ इंडिया’ (लंडन) संस्थेतर्फे पुरस्कार वितरण होईल. जगभरातून 45 नागरिकांना हा सन्मान दिला जातो. हा पुरस्कार मिळविणारे र्‍हीदम वाघोलीकर हे सर्वात तरुण भारतीय आहेत.

हा पुरस्कार गुरूवार, दि. 25 ऑक्टोबर 2018 रोजी ‘ग्लोबल अचिव्हर्स कॉनक्लेव्ह’ दरम्यान ब्रिटीश पार्लमेंट (‘हाऊस ऑफ कॉमन्स’) लंडन येथे देण्यात येणार आहे. खासदार वीरेंद्र शर्मा यांनी वाघोलीकर यांना कॉनक्लेव्हसाठी निमंत्रित केले आहे.

र्‍हीदम हे सामाजिक विषयांवर जनजागृतीचे काम करणाऱ्या ‘क्रिएटिंग पॉसिबिलिटीज’ स्वयंसेवी सेवी संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनी ‘स्वरलता-रिदमिक रेमीनीसेस ऑफ लता दीदी ’या लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तक तसेच किशोरीताईंवरील ‘द सोल स्टिरिन्ग व्हॉईस -गानसरस्वती किशोरी आमोणकर’ ही पुस्तके लिहिली आहेत.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील , पंडित बिरजू महाराज यांनी वाघोलीकर यांच्या लेखन उपक्रमाचे कौतुक केले आहे. तसेच वाघोलीकर गौरी सावंत यांच्या समवेत अनाथ मुलींना मदतीचे सामाजिक कार्य करत आहेत.

र्‍हीदम वाघोलीकर यांना इस्मा इन्स्टिट्यूट (इंटरनॅशनल स्पिरिच्युलिटी मार्केट)च्या वतीने अध्यात्म क्षेत्रातील दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच ‘आसिआन थाई इंडियन बिझनेस लीडरशिप’ परिषदेत ‘रुवा उद्योजक’ सन्मान, ‘कला गौरव राष्ट्रीय पुरस्कार’, ‘इंटरनॅशनल अचिव्हर्स’ पुरस्कार (दुबई), सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार, अमृता फडणवीस यांच्या हस्ते ‘फेमिना मोस्ट पॉवरफुल ऑफ द यीअर 2018’ पुरस्कार मिळाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.