Pune : स्मिता दुर्गादास घुगे यांनी रचला इतिहास, रशियातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रूसवर फडकवला तिरंगा

एमपीसी न्यूज – स्मिता दुर्गादास घुगेने  वीरांच्या बलिदानाला सलाम करत रशियातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रसवर चढून 3900 मीटर उंचीवर 75 फूट तिरंगा ( Pune ) फडकवत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला.  5642 मीटर उंच माउंट एल्ब्रूस शिखरावर चढाई करण्याचा विक्रम स्मिताच्या नावावर झाला आहे.

माउंट एल्ब्रूस हे रशिया-युरोप खंडातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाते. हे 18 हजार 510 फूट उंच शिखर नेहमीच बर्फाने झाकलेले असते. उणे 25 अंश तापमान आणि वादळी वाऱ्यात शिखरावर चढणे आव्हानात्मक होते. गिर्यारोहक स्मिता घुगे यांनी हे आव्हान स्वीकारत 3 हजार 900 मीटर उंची गाठली आणि भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नऊवारी साडी नेसून 75 फूट उंचीचा भव्य तिरंगा त फडकवून नवा विश्वविक्रम रचला. ‘360 एक्सप्लोरर’ या गिर्यारोहण संस्थेच्या आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता यांनी  ही कामगिरी केली. ज्यानंतर त्याचे कौतुक होत आहे.

Pune : पुणे-लोणावळा पाठोपाठ रविवारी लोणी व हडपसर येथेही रेल्वेचा ब्लॉक, काही गाड्या रद्द तर काहींच्या वेळापत्रकात बदल

स्मिताचे स्वप्न 7 खंडातील 7 सर्वोच्च शिखरे सर करण्याचे आहे. यापूर्वी, स्मिता यांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर, 19,341 फूट (5,895 मीटर) माउंट किलीमांजारोवर 75 फूट तिरंगा ध्वजही फडकावला होता. यासोबतच स्मिताने आशियातील माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवरही चढाई केली आहे. ज्यामध्ये 19 फेब्रुवारी 2022 रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर 5,364 मीटर (17598 फूट) उंचीवर 40 फूट भगवा ध्वज आणि 75 फूट तिरंगा ध्वज फडकवून भारताचा अमृत महोत्सव आणि शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

गिर्यारोहक स्मिता म्हणाल्या की, एल्ब्रूस पर्वतावर चढाई हा तिच्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. अत्यंत प्रतिकूल वातावरणात खडतर चढाई करताना शिवरायांची ज्वलंत प्रेरणा कायमच मनात होती. परिवार, आनंद बनसोडे आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या प्रेरणेने मला हे यश मिळाले आहे, ते मी शिवरायांना अर्पण ( Pune ) करते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.