Pune : पुणे-लोणावळा पाठोपाठ रविवारी लोणी व हडपसर येथेही रेल्वेचा ब्लॉक, काही गाड्या रद्द तर काहींच्या वेळापत्रकात बदल

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे विभागाने दुरुस्ती सिग्नल व दुरुस्तीच्या कामामुळे रविवारी (ता. 20) तीन ठिकाणी ब्लॉक घेतला आहे. यात ( Pune ) खडकी-चिंचवड, नीरा-लोणंद व हडपसर स्थानकाचा समावेश आहे. त्यामुळे पुण्याहून सुटणाऱ्या व पुणे विभागातून धावणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या रद्द त काहींच्या वेळांत बदल झाला आहे.

खडकी ते चिंचवड येथे सिग्नलचे काम असल्याने लोकल व दोन अक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर पुणे स्टेशन ते लोणी , हडपसर भागातही ब्लॉक घेतला असून काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळामध्ये बदल कऱण्यात आला आहे तो पुढील प्रमाणे असेल.

Pune : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सिंहगड रस्त्यावर वाहतूकीत बदल

पुणे-जयपूर एक्स्प्रेस ही गाडी पुण्याहून संध्याकाळी पावणे सहा वाजता सुटेल. तर दौंड-इंदूर एक्सप्रेस दौंड हून सायंकाळी सहा वाजता सुटेल. तसेच  मुंबई-चेन्नई, लोकमान्य तिलक टर्मिनस-काकीनाडा पोर्ट, मुंबई-भुवनेश्वर, मुंबई-हैदराबाद या गाड्यांना पुणे विभागातून धावताना आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील.

पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील नीरा-लोणंद स्थानक दरम्यान ब्लॉक घेण्यात आला. यात पुणे-कोल्हापूर डेमू एक्स्प्रेस पुणेऐवजी सातारा येथून कोल्हापूरसाठी रवाना होईल. त्यामुळे परतीच्या प्रवासात ती गाडी कोल्हापूर ते सातारा अशी धावेल. सातारा ते पुणे अशी धावणार नाही. शनिवार (ता. 19) चंडीगड-यशवंतपूर एक्सप्रेस दौंड-कुर्डुवाडी-मिरज या बदललेल्या मार्गाने धावेल. रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 1.55 या दरम्यान हडपसर स्थानकावरून धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आलेले आहे.

पुणे-दौंड डेमू, दौड-पुणे डेमू या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पुणे-हबीबगंज ही रेल्वे पुणे स्थानकावरून दुपारी पाच वाजता सुटेल, हैदराबाद-हडपसर ही गाडी दौड स्थानकापर्यंत ( Pune )धावेल, चेन्नई-कुर्ला ही रेल्वे दौंड, मनमाड मार्गे धावेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.