Pune : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सिंहगड रस्त्यावर वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज – सिंहगड रस्ता वाहतूक विभाग अंतर्गत वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी वाहतुकीत बदल (Pune) करण्यात आल्याचे आदेश वाहतूक विभागाकडून देण्यात आले आहे.

स्वारगेट कडून वडगाव पूल (वीर बाजी पासलकर) चौकाकडे येणारी वाहतूक सिंहगड रस्त्याने गणेश मळा सिग्नल येथे डावीकडे वळून जनता वसाहत कालवा रस्त्याने कै. मिसाळ उद्यान ( कॅनॉल जंक्शन) येथे डावीकडे वळून कालव्याच्या उजव्या बाजूने आनंद विहार रस्त्याने तुकाई नगर चौकापर्यंत एकेरी करण्यात आली आहे.वडगाव पूल ( वीर बाजी पासलकर)

चौकाकडून स्वारगेट कडे जाणारी वाहतूक सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय चौकातून डावीकडे वळून कॅलिंक ( लंडन पूल चौक) ते कै. मिसाळ उद्यान (कॅनॉल जंक्शन) चौकातून डावीकडे वळून विश्रांती नगर चौकापर्यंत एकेरी वाहतूक करण्यात येत आहे. कै. मिसाळ उद्यान (कॅनॉल जंक्शन) कडून येणारी वाहने कालव्याच्या डाव्या बाजूने जाण्यास बंदी करण्यात आली आहे.

Maharashtra : विकसित भारत घडविण्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची – राज्यपाल रमेश बैस

दोन्ही कालवा रस्ते जोडणाऱ्या कॅलिंग अर्थात लंडन पुलावरून हिंगणे ते महादेव नगर कडे जाण्याकरिता चार चाकी वाहनांना बंदी असून फक्त दुचाकी वाहनांना प्रवेश देण्यात येईल.जनता वसाहत ते सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय फन टाईम थिएटर पर्यंत कालवा रस्त्यावर जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.

वीर शिवा काशिद अर्थात माणिकबाग डीपी रस्ता (गोयल गंगा) चौकाकडून सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडे जाताना गोयल गंगा चौक ते आय.सी.आय.सी.आय. बँकेपर्यंत (दुभाजक संपेपर्यंत) रस्त्याच्या दोन्ही बाजूला 50 मीटर पर्यंत ‘नो पार्किंग’ क्षेत्र तयार करण्यात आले आहे.

गोयलगंगा चौक ते आयसीआयसीआय बँक अमृतगंगा सोसायटी गेट क्रमांक चार शोरबा हॉटेलपर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला फक्त दुचाकी वाहन करता पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच रस्त्याच्या उजव्या बाजूस दुभाजक संपल्यानंतर मनपा प्रस्तावित नाट्यगृह ते अतिथी हॉटेलपर्यंत फक्त चार चाकी वाहन करता पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

रस्त्याच्या उजव्या बाजूस एचडीएफसी बँके पासून ते सोबा ऑप्टिमा सोसायटी गेट( प्रेमाचा चहा शॉप) पर्यंत फक्त दुचाकी वाहन करता पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

यासोबतच सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून वीर शिवा काशी चौकाकडे जाताना सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय चौक ते दुभाजक संपेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस 100 मीटर पर्यंत (Pune) नो पार्किंग करण्यात येत आहे.

वाहतूक बदलाबाबत नागरिकांच्या सूचना किंवा हरकती असल्यास त्या पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक सहा, जेल रोड पुणे या कार्यालयात 20 ऑगस्ट पर्यंत लेखी स्वरुपात कळविण्यात याव्यात असे आवाहन केले आहे.

नागरिकांच्या सूचना आणि हरकतींवर विचार करूनच अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश देण्यात येतील असे वाहतुक विभागाचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

यासोबतच नागरिकांच्या सूचना आणि हरकती विचारात घेऊन वडगाव ते पाउंजाई माता मंदिर रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक चौक ते विष्णुपुरम सोसायटीच्या प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याच्या दोन्ही (Pune) बाजूला 50 मीटर पर्यंत ‘नो पार्किंग’ करण्याचे अंतिम आदेश देण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.