Pune : एसआरएच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बोलवून चर्चा करावी आणि त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या विषयाला मान्यता दिलेली आहे त्या सर्व प्रकरणाची तातडीने चौकशी करून स्थगिती द्यावी – माजी नगरसेवकांची मागणी

एमपीसी न्यूज – एसआरएच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बोलवून (Pune)चर्चा करावी आणि त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या विषयाला मान्यता दिलेली आहे त्या सर्व प्रकरणाची तातडीने चौकशी करून स्थगिती द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी केली आहे.

कलम तीनचे नोटिफिकेशन निघाले असले तरी देखील त्या संदर्भामध्ये राज्य शासनाकडे पाठपुरावा करून अथवा प्राधिकरणाकडे अपील दाखल करावे, असेही आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यासंबंधी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेऊन तातडीने(Pune) जिओ लेटर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे पाठवले. आम्ही त्या विषयाचा पाठपुरावा करीत होतो.

माननीय निलेश गटने IAS मुख्याधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी आम्हाला असे सांगितले आहे की, खाजगी वाड्यांना झोपडपट्टी सदृश्य घोषित करण्यात आल्याचा अहवाल मी महापालिकेला पत्राद्वारे दिला आहे.

Pune : ‘मानवरहित विमान प्रणाली आणि ड्रोन तंत्रज्ञान’ विषयावर प्रशिक्षण शिबीर

त्यामध्ये याप्रकरणी खाजगी जागांवरील अघोषित झोपडपट्टी संदर्भात योजना राबवणे कामी काय पावले उचलता येतील याबाबत उहापोह केला आहे. आता महापालिकेने नियुक्त केलेल्या त्रीसदस्य समितीने त्यांचा अहवाल पाठवणे अपेक्षित आहे.

आता यातलं नेमकी वस्तूस्थिती करण्यास मार्ग नाही आपण म्हणता पत्र पाठवलं नाही, ते म्हणतात पत्र पाठवलं, त्यांनी पाठवलेलं पत्र काय आहे, आपण मागितलेली माहिती त्यांनी दिली आहे का, या झोपडपट्टी सदृश्य वाड्यांच्या मध्ये पुन्हा एकदा झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी महानगरपालिकेकडून तयार करून घ्यायचा आहे हे कळण्यास मार्ग नाही, असेही या नागरसेवकांनी सांगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.