Pune : परदेशात शिक्षण संस्थेत प्रवेश व व्हिसा मिळवून देतो म्हणून विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसणूक

एमपीसी न्यूज – परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश आणि व्हिसा ( Pune) मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी विमाननगर परिसरातील ‘माय कॉलेज खोज’ संस्थेच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.

Chakan : चाकणला मेथी, कोथिंबीर व शेपूची भरपूर आवक ;  कांद्याची आवक घटून भावात किंचित वाढ

या प्रकरणी एका तरुणीने (रा. अंबरनाथ, जि. ठाणे) विमाननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पूनम चंदनसिंग राजपूत (वय 25, रा. रामवाडी) व सौरभ मनोज झा (वय 26, रा. खराडी) यांना अटक केली आहे तर अमित कुमार (वय 38, रा. मगरपट्टा सिटी), प्रतिभा भाटी (वय 34, रा. मगरपट्टा सिटी) हे फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी उच्च शिक्षणासाठी इटलीला जाणार होती. तिने विमाननगर परिसरातील ‘माय कॉलेज खोज’च्या संकेतस्थळावर नाव नोंदणी केली. इटलीतील शैक्षणिक संस्थेत प्रवेश आणि व्हिसा मिळवून देण्यासाठी आरोपींनी तिच्याकडून दोन लाख सहा हजार रुपये घेतले.

तसेच, बनावट बॅंक स्टेटमेंट तयार करून तरुणीला सरकारी कार्यालयात कागदपत्रे दाखल करण्यास सांगितले. परंतु प्रवेश न मिळाल्याने तिने विचारणा केली. तेव्हा संस्थेतील संचालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तरुणीने चौकशी असता इतर चार-पाच विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे समजले. याबाबत तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला ( Pune)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.