Chakan : चाकणला मेथी, कोथिंबीर व शेपूची भरपूर आवक ;  कांद्याची आवक घटून भावात किंचित वाढ

चाकण बाजारभाव - रविवार, दि. 4 फेब्रुवारी,2024

एमपीसी न्यूज –     चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात  हिरवी मिरची,  टोमॅटो, वांगी व कोबी यांची आवक घटली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर व शेपू यांची विक्रमी आवक होऊन भावात घसरण झाली. लसणाची आवक घटल्याने भाव तेजीत राहिले.

जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल, म्हैस व शेळ्या – मेंढ्या यांच्या संख्येत घट होवूनही त्यांचे भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल 4 कोटी 70 लाख रुपये झाली.चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 4 हजार 500 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 1  हजार क्विंटलने घटल्याने भावात 100 रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 1,400 रुपयांवरून 1,500 रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक 1650  क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 4 हजार 850 क्विंटलने घटून कमाल भाव 1,500 रुपयांवर स्थिरावला.

 

जळगाव भुईमुग शेंगाची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 23  क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 2  क्विंटलने घटल्याने भावात 5  हजार रुपयांची उच्चांकी वाढ झाली. लसणाचा कमाल भाव 20  हजार रुपयांवरून 25  हजार रुपयांवर पोहोचला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 386 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 14  क्विंटलने घटून भावात देखील घट झाली. हिरव्या मिरचीला 3 हजार रुपयांपासून ते 4  हजार रुपयांपर्यंत भाव (Chakan) मिळाला.

Chakan : शिरूर लोकसभा मतदार संघाचा कॉंग्रेसकडून आढावा

 शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे –
कांदा – एकूण आवक – 4,500  क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,500 रुपये, भाव क्रमांक 2 . 1,300 रुपये, भाव क्रमांक 3. 1,000 रुपये.
बटाटा – एकूण आवक – 1650 क्विंटल. भाव क्रमांक 1.1,500 रुपये, भाव क्रमांक 2. 1,200 रुपये, भाव क्रमांक 3. 1,000 रुपये.

 फळभाज्या –खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Chakan) चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये लसूण, वाटाणा, व कांद्याची आवक घटली आहे. 
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे –
टोमॅटो – 170 क्विंटल ( 3000 ते 4000  रू. ), कोबी – 180  क्विंटल ( 800  ते 1200  रू.), फ्लॉवर -235  क्विंटल ( 500 ते 1000 रु.), वांगी – 84 क्विंटल ( 1000 ते 2000 रु.), भेंडी – 83  क्विंटल ( 3000 ते 4000 रु.), दोडका – 52  क्विंटल ( 3500 ते 4500 रु.), कारली – 64  क्विंटल ( 3000 ते 4000 रु.), दुधीभोपळा – 69 क्विंटल ( 1000 ते 2000 रु.), काकडी – 68 क्विंटल ( 1000 ते 2000रु.), फरशी – 59 क्विंटल ( 2000 ते 3000 रु.), वालवड – 76 क्विंटल ( 2000 ते 4000 रुपये), गवार – 62  क्विंटल (5000  ते 6000 रुपये, ), ढोबळी मिरची – 170 क्विंटल ( 3000  ते 4000 रु.), चवळी – 32 क्विंटल ( 2000  ते 3000 रु.), वाटाणा – 450 क्विंटल (3600  ते  4200 रु.), शेवगा – 27  क्विंटल ( 5000 ते 7000  रु.), गाजर – 325  क्विंटल ( 800 ते 1200 रु.),.

 पालेभाज्या –  
चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे –
मेथी – एकूण 34 हजार 500 जुड्या ( 300 ते 500रुपये,), कोथिंबीर – एकूण 38  हजार जुड्या ( 200 ते 600 रुपये,), शेपू – एकूण 3 हजार 600 जुड्या (500 ते 800 रुपये ), पालक – एकूण 4  हजार 200  जुड्या ( 300 ते 600 रुपये),.

 जनावरे –
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 50  जर्शी गाईपैकी 42 गाईची विक्री झाली. ( 15000ते 70000 रु.), 110 बैलांपैकी 90  बैलांची विक्री झाली. ( 10000 ते 40000 रु.), 140  म्हशीपैकी 120 म्हशींची विक्री झाली.( 30000 ते 80000 रु.), 9  हजार 700 शेळ्या – मेंढ्यापैकी 9,400 शेळ्यांची विक्री झाली. ( 2000 ते 25000 रु.),

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.