Chakan : शिरूर लोकसभा मतदार संघाचा कॉंग्रेसकडून आढावा

शासनाच्या विरोधात रास्तारोको आंदोलन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात येणारे उद्योग धंदे अन्य राज्यात जातात, स्पर्धा परीक्षांमधील( Chakan) घोटाळे बाजांवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ खेड तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चाकण ( ता. खेड ) येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. शासनाच्या विविध धोरणांवर यावेळी जोरदार प्रहार करण्यात आला.  ‘रोजगार द्या, न्याय द्या’.. अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

Pune : विद्यापीठातील तोडफोड प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक निलंबित

शिरूर लोकसभा मतदार संघ व सर्व विधानसभा मतदार संघाचा आढावा पुणे जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने चाकण ( ता. खेड ) येथील महात्मा फुले मार्केटच्या सभागृहात रविवारी (दि.4) घेण्यात आला. तत्पूर्वी शासनाच्या विरोधात जोरदार आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप, माजी आमदार व शिरूर लोकसभा मतदार संघाचे पक्षाचे निरीक्षक रामहरी रूपनवर, सत्यशील शेरकर, कैलास कदम, विजय डोळस, महेश ढमढेरे, जमीर काझी, महेश टापरे, आनंद गायकवाड, निलेश कड पाटील, वंदना सातपुते, अनुराग जैद, गणेश शहाणे, गीता मांडेकर, अतिश मांजरे आदींसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा अध्यक्ष ,समन्वयक, युवक,महिला,सेवादल काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

3 लोकसभा मतदार संघांवर कॉंग्रेसचा दावा – आ. जगताप
पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदार संघासह बारामती, मावळ लोकसभा मतदार संघावर पुणे जिल्हा कॉंग्रेसने दावा केला आहे. यासाठी तीन उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.  शिरूर लोकसभा मतदार संघातील खेड व जुन्नर या विधानसभा मतदार संघाची देखील मागणी कॉंग्रेस कडून करण्यात आली असल्याची माहिती कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष आ. संजय जगताप यांनी दिली. महाविकास आघाडी मध्ये पुणे जिल्ह्यात कॉंग्रेस सक्षमपणे काम करत असल्याचे देखील आ. जगताप यांनी ( Chakan) सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.