Pune : विद्यापीठातील तोडफोड प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक निलंबित

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Pune) ललित कला केंद्राच्या आवारात तोडफोड करण्यात आल्यानंतर या घटनेची माहिती बंदोबस्तावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरीत न कळविल्याने अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

सचिन शंकर गाडेकर असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

Pune : गांजा विक्रीसाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील दोघांना अटक; 69  हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

ललित कला केंद्राच्या आवारात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गाडेकर यांनी योग्य ती दखल घेतली नाही. तेथे शीघ्र कृती दलाला (रॅपिड ॲक्शन फोर्स) बोलाविले नाही, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्त, उपायुक्त यांच्यासह नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती त्वरीत कळविली नाही.

जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना कर्तव्यात कसुरी केली.कर्तव्यातील बेजबाबदारपणामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. पूर्व विभागाचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन गाडेकर यांनी निलंबित करण्याचे आदेश (Pune) दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.