Pune : गांजा विक्रीसाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील दोघांना अटक; 69  हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – नगर रस्त्यावर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी ( Pune ) पकडले. त्यांच्याकडून पावणेतीन किलो गांजा, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Ravet : नौशाद शेखवर आणखी एक गुन्हा

सागर कुमार (वय 23), शिवम सरोज (वय 22, दोघे मूळ रा. गोरीडी, संत बिरदास नगर, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चंदननगर भागातील नागपाल रस्त्यावर दोघे जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड यांना मिळाली.

पोलिसांच्या पथकाने सापळा लावून सागर आणि शिवम यांना पकडले. त्यांच्याकडील पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा आढळून आला. दोघांकडून पावणेतीन किलो गांजा, मोबाइल संच असा 69  हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, सहायक निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अरविंद कुमरे, महेश नाणेकर, विकास कदम, दिलावर सय्यद, श्रीकांत शेंडे, अविनाश संकपाळ यांनी ही कारवाई ( Pune ) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.