Pune News : अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या हस्ते सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा सन्मान

एमपीसी न्यूज – मुंबई येथे नुकत्याच  पार पडलेल्या  सोहळ्यात सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या हस्ते ग्लोबल बिझनेस (Pune News) अवार्डने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील उदयोन्मुख क्षेत्रातील अभ्यासक्रमांचे शिक्षण देणारी सर्वोत्कृष्ट बहुशाखीय शिक्षण संस्था म्हणून ‘सूर्यदत्तला गौरविण्यात आले. 

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांच्यासह ‘सूर्यदत्त’ परिवारातील रेणुका घोसपुरकर, पूजा विश्वकर्मा, अभिश्री मोर यांनी शिल्पा शेट्टी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. रेणुका घोसपुरकर व पूजा विश्वकर्मा यांनी शिल्पा शेट्टीचा चित्रपट प्रवास दर्शविणारे एक स्क्रॅप बुक सादर केले. हे स्क्रॅप बुक सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये (एसआयएफटी) फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.

Pune News : राज्यात ड्रग्जविरोधात अभियान राबविणार – देवेंद्र फडणवीस

विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘ग्लोबल बिझनेस अवार्ड्स’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. शिक्षणापासून आरामदायी जीवनशैली अशा वैविध्यपूर्ण (Pune News)  क्षेत्रातील चांगले कार्य कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांची निवड करून त्यांना सन्मानित केले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.