Pune : जयप्रकाश नारायण यांच्या विचारांची देशाला गरज: डॉ. कुमार सप्तर्षी

एमपीसी न्यूज – लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या (Pune)नावाचा पुरस्कार म्हणजे खूप़ मोठा ठेवा आहे. हे सर्व पुरस्कारार्थी त्याला पात्र आहेत. जयप्रकाश नारायण विवेकशील आणि सद्सद्विवेकबुद्धी जपणारे आणि हळवे होते.

जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी माझे गुरू होते, त्यांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे मत डॉ. सप्तर्षी यांनी व्यक्त केले.

लोकनायक जयप्रकाश नारायण पुरस्कार सोहळा 2023 चे आयोजन शनिवार 16 डिसेंबर रोजी गांधी भवन, कोथरूड येथे आयोजित करण्यात आले होते. अभिनेते किरण माने, प्राज इंडस्ट्रीज चे राजेंद्र सखाराम मोरे, दिग्दर्शक सागर वंजारी, लेखक विनायक होगाडे यांना हा पुरस्कार देण्यात आला.

पुष्पगुच्छ, शाल, आणि (Pune)लोकनायक जयप्रकाश नारायण यांची प्रतिमा असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रदिप (बाबा) धुमाळ, लोकनायक जयप्रकाश नारायण पुरस्कार समिती प्रमुख आयोजक राहुल शेलार, सुनील कदम , धनंजय भावलेकर , संदिप बर्वे , जांबुवंत मनोहर ,सचिन पांडुळे, सौ. दिपाली धुमाळ , संतोष मेढेकर, सतिश शेलार ,अरविंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Pimpri : पाण्याची बाटली आणली नाही म्हणून स्वयंघोषित भाईने केला तरुणावर खुनी हल्ला
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, आज देशात हुकुमशाहीचं सावट आहे. आता काही हालचाल केली नाही तर देशाचे काही खरे नाही.पंतप्रधान म्हणून एकही कर्तव्य नीट पार पाडले गेले नाही. अर्थव्यवस्था, एकात्मता, शेजारील राष्ट्रांशी संबंध नीट ठेवले नाही. ही हुकुमशाही घालवली पाहिजे. इंदिरा गांधीच्या काळात जयप्रकाश नारायण यांच्यासारखे सद्सद्वविवेक बुद्धी असणारे नेते होते. आत्ता ते नाहीत.

त्यांची उणीव भासते आहे.त्यांचें विचार आताच्या परिस्थितीत दिशा दर्शक असून पुढे नेले पाहिजेत. प्रत्येकाने नैतिकता वापरली पाहिजे. यावेळी कमळाला मतदान करू नका. चुकीचं मतदान केलं तर पुढील पिढीला आपण सजा दिल्यासारखे होईल, असे ते म्हणाले.

अभिनेते किरण माने यांनी पुरस्काराबद्दल आभार व्यक्त केले. ते म्हणाले, ‘ तुम्हाला अभिमान वाटेल असे काम आम्ही करू. कला आणि सामाजिक जाणीवा एकजीव झालं तर त्यातून कला अधिक प्रभावी होते. कलाकार विद्रोही असला पाहिजे. कलाकाराला समाज भान असणं गरजेचे आहे ‘.

भोसले ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे प्रमुख किसन भोसले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी होते. अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद चव्हाण यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.