Pune : शेतकरी, बेरोजगार युवक व अंगणवाडी आशा सेविकांची नाराजी करणारा हा अर्थसंकल्प – ॲड. सचिन भोसले

एमपीसी न्यूज : शेतकरी, बेरोजगार युवक व अंगणवाडी आशा सेविकांची नाराजी (Pune) करणारा हा अर्थसंकल्प अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांनी दिली.

अंगणवाडी आशा सेविकांना यापूर्वीच सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्याने घोषणा करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. या अर्थसंकल्पात प्राप्ती करात सवलतीची अपेक्षा होती. ती फोल ठरल्याने प्राप्तिकर भरणाऱ्या नोकरदार वर्गाचा आणि छोटे व्यवसायिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. शिक्षण, आरोग्य, लघु उद्योग क्षेत्रासाठी अधिक तरतूद करण्याऐवजी केंद्र सरकार जबाबदारी झटकत असल्याचे दिसते.

Pimpri : भारतीय तरूणांना जगभरात संधी – आशिष अचलेरकर

या अर्थसंकल्पातून बेरोजगारीलाच चालना मिळेल. गरीब माणूस आणखी गरीब होत आहे. शेतमालाचे निर्यात धोरण शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरणारे आहे. सवलतीच्या पोकळ घोषणा करीत असताना रोजगार वाढीसाठी काय केले याकडे दुर्लक्ष (Pune) केले आहे. महिला, गरीब, तरुण, शेतकरी या वर्गासाठी मागील दहा वर्षात यांच्याकडे दुर्लक्ष करून यांची पिळवणूकच केली आहे. या वर्गासाठी व बेरोजगार युवकांसाठी मागील दहा वर्षात नक्की काय केले याची श्वेतपत्रिका केंद्र सरकारने जाहीर करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.