Pune : पुणे विमानतळावर दुबईहून आलेल्या महिलेकडून 90 लाखांचे सोने जप्त

एमपीसी न्यूज- आखाती देशातून आलेल्या महिलेकडून सीमा शुल्क विभागाने 90 लाखांचे सोने जप्त केले. या महिलेने सोन्याची भुकटी प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून ठेवली होती. ही कारवाई पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर रविवारी (दि.18) सकाळी करण्यात आली.

डॅनटसा ज्युनेका जॉन असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली महिला ही रविवारी सकाळी दुबईहून आलेल्या विमानाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. विमानतळाच्या परिसरातून भराभर वेगाने चालत असताना तिच्यावर संशय आल्यामुळे सीमाशुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिला अडवले. तिची व तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली. स्कॅनिंग दरम्यान महिलेच्या कमरेला असलेल्या पट्ट्याला चार छोट्या पिशव्या लवपवल्याचे समोर आले. या पिशव्यांमध्ये तब्बल 2 किलो 791 ग्रॅम एवढ्या वजनाची सोन्याची भुकटी सापडली. त्या भूकटीची किंमत 90 लाख 44 हजार इतकी आहे.

महिलेस सीमाशुल्क विभागाकडून अटक करण्यात आली असून तिच्याकडील तस्करी करून आणलेले सोने जप्त करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.