Pune : तीस सेकंदात परिच्छेद वाचण्याचा विश्वविक्रम

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ( Pune )  मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात आतापर्यंत तीन विश्वविक्रम नोंदवले गेले आहेत. त्यानंतर आता तीस सेकंदात परिच्छेद वाचण्याचा विश्वविक्रम नोंदवला जाणार आहे. या अंतर्गत दहा हजार व्हिडिओचा विक्रम मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे.

पुणे पुस्तक महोत्सवात ‘लार्जेस्ट ऑनलाइन अल्बम ऑफ पीपल रिडींग सेम पॅराग्राफ ऑफ मिनीमम ड्यूरेशन ऑफ 30 सेकंड’ असा एक विश्वविक्रम करण्यात येणार आहे. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी हा विश्वविक्रम करण्यात येणार आहे. अतिशय उत्तम पध्दतीने वाचन करून लोक व्हिडीओ तयार करत आहेत. सर्वांचा आशय एकच हवा, डुप्लिकेशन असता कामा नये अशी आव्हाने त्यात आहेत.

Pimpri : कोरियन ब्लॉगर तरुणीसोबत गैरवर्तन; संबंधित तरुणाला अटक

त्यामुळे फेस रेकग्निशन तंत्राचा वापर करण्यात येत आहे. पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देणाऱ्या नागरिकांकडून परिच्छेद वाचून घेऊन व्हिडिओ तयार करण्यात येत आहेत. तसेच राज्यभरातून नागरिक व्हिडिओ पाठवत आहेत. हा परिच्छेद हिंदी आणि इंग्रजीमध्ये अनुवादित करण्यात आल्याने देशभरातून आणि परदेशातूनही व्हिडिओ येत आहेत, असे  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नोलॉजीचे प्रमुख आदित्य अभ्यंकर यांनी सांगितले.

गिनीज बुक ऑफ रेकॉर्डकडून 20 डिसेंबरला व्हिडिओंची पाहणी करण्यात येणार आहे, तर विक्रमाबाबतचा निकाल  21 डिसेंबरला त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या पूर्वीचे रेकॉर्ड हे केवळ फोटोचे आहे पण पहिल्यांदाच व्हिडिओचा विश्वविक्रम केला जाणार आहे, असेही अभ्यंकर ( Pune ) म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.