Pimpri : कोरियन ब्लॉगर तरुणीसोबत गैरवर्तन; संबंधित तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – कोरियन ब्लॉगर तरुणीशी गैरवर्तन केल्याचा एक (Pimpri)  व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे . एका तरुणाने गैरवर्तन केल्यानंतर कोरियन तरुणीने तेथून पळ काढल्याचे व्हिडीओत  आढळून आले. हा व्हिडिओ पिंपरी- चिंचवडमधील असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकाने त्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

Pune : खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे उद्या आंदोलन

तरुणीने तिच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तिचे 1.69 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. ती पर्यटनासाठी भारतात आली आहे. ही तरुणी रस्त्यावर फिरत असताना काही स्थानिक लोकांबद्दल माहिती गोळा करत होती. त्याचवेळी एका दुकानापाशी आल्यानंतर तिने लोकांची विचारपूस करत असतानाच एक तरुण अचानक समोर आला आणि फोटो काढण्याच्या बहाण्याने तरुणाने तिच्या खांद्यावर हात टाकला व त्यानंतर गळ्यातदेखील हात टाकला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. संबंधित व्हिडीओत तरुण मराठीत बाेलत आहे. हा व्हिडिओ पिंपरी- चिंचवडमधील रावेत भागातील असल्याचे समोर आल्यानंतर पिंपरी- चिंचवडच्या गुंडाविरोधी पथकाने तपास करत गैरवर्तन करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.