Pune : खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे उद्या आंदोलन

एमपीसी न्यूज – शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य ( Pune ) नागरिकांच्या प्रश्नांसाठी संविधानिक पद्धतीने संसदेत लढणारे  खासदार सुप्रियाताई सुळे आणि खासदार, डॉ. अमोल कोल्हे यांचे निलंबन करून मोदी सरकारने हुकूमशाहीचे शिखर गाठले आहे.या हुकुमशाहीच्या विरोधातील निकराचा लढा म्हणून उद्या दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

Alandi : रिंगण वक्तृत्व स्पर्धेत नाशिकची श्रुती बोरस्ते पहिली

 या लढ्यात सामील होण्यासाठी तथा लोकसभेतील खासदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बुधवारी  दि. 20  डिसेंबर 2023 , सकाळी – 09.00 वाजता वारजे उड्डाण पुलाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष (पवार गट) प्रशांत जगताप यांनी आज ( Pune ) दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.