Today’s Horoscope 20 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 20 December 2023- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – बुधवार.

तारीख- 20.12.2023.

शुभाशुभ विचार-  चांगला दिवस.

आज विशेष – दुर्गाष्टमी, बुधाष्टमी.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा 22.58 पर्यंत नंतर रेवती.

चंद्र राशी – मीन.
—————————–
मेष  ( शुभ रंग – मरून )

आज घाई गर्दीत निर्णय घ्याल तर ते चुकण्याची शक्यता जास्त आहे. ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. आवक उत्तम असताना बचतीस जरूर प्राधान्य द्या.

वृषभ  ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात दुपारनंतर अनुकूलता वाढेल. तुम्ही केलेल्या कष्टांचे चीज होऊन तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल. एखादी गहाळ झालेली वस्तू आज दुपारनंतर सापडेल.

मिथुन  ( शुभ रंग- पांढरा)

सर्व महत्त्वाची कामे दिवसाच्या पूर्वार्धात उरकून टाका. आज संध्याकाळी काही जुनी मित्र मंडळी भेटतील. मॉलमध्ये फेरफटका मारून अनावश्यक खर्च कराल.

कर्क  ( शुभ रंग – गुलाबी)

कार्यक्षेत्रातील काही मनासारख्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. खिशात पैसाही खेळता राहील प्रतिष्ठित लोकांमधील उठबस व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने कमी येईल.

सिंह ( शुभ रंग – पिस्ता)

आजच्या दिवसात काही मनाविरुद्ध घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या दडपणाखाली काम करावे लागेल. गृहिणींना घरातील थोडा मोठ्यांची मने जपावी लागतील.

कन्या ( शुभ रंग- केशरी)

कोणतीच गोष्ट आज सहज साध्य नसली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच मिळणार आहे. तरुण वर्गाने हौसमज करताना कायद्याचे बंधन पाळावे.

तूळ ( शुभ रंग- आकाशी)

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. कुसंगतीमुळे आज प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते सतर्क रहा.

वृश्चिक ( शुभ रंग – निळा)

कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्ही स्वीकारून पूर्ण करून दाखवाल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज जोडीदाराला दिलेले शब्द पाळण्याचा प्रयत्न कराल.

धनु (शुभ रंग- जांभळा)

ध्येयप्राप्ती साठी कामाचे तास वाढवावे लागतील. काही येणी असतील तर मागायला लाजू नका. रुग्णांनी पथ्य पाणी पाळावे गृहिणीसाठी आज अतिव्यस्त दिवस आहे.

मकर ( शुभ रंग – डाळिंबी)

कलाकारांच्या उमेदवारीला यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. नोकरदारांना वरिष्ठांचे मूड सांभाळावेच लागतील. रुग्णांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल.

कुंभ  (शुभ रंग- पिस्ता)

आनंदी व उत्साही दिवस असून सगळी कामे सुरळीत पार पडतील. घर सजावटीसाठी काही पैसा खर्च कराल. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील.

मीन ( शुभ रंग- क्रीम)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हानांना यशस्वीपणे तोंड द्याल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होऊ शकतील.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन- 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.