Rahatani : दारु पिऊन पत्नीला मारल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज –  दारु पिऊन पत्नीला बेल्टने मारहाण (Rahatani) केल्या प्रकऱणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 व 13 जून रोजी काळेवाडी व रहाटणी येथे घडला आहे.

NCP : आमदार अण्णा बनसोडे दादांची साथ सोडून भाईंचा हात धरणार?

याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून असद इसराक खान (वय 26 रा. रहाटणी) याच्या विरोधात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, आरोपीने किरकोळ कारणावरून पत्नीला दारु पिऊन बेल्टने मारहाण केली होती. यावेळी पत्नी माहेरी निघून गेली असता आरोपीने तिच्या माहेरी जात तिथेही तिला मारहाण करत गोंधळ घातला. यावरून वाकड पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावली असून पोलीस पुढील तपास करत (Rahatani) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.