Rahatani News : भविष्य अंकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध  (Rahatani News) राजज्योतिषी, भविष्य दिवाळी अंकाचे संपादक, लेखक आणि प्रकाशक विजयकुमार स्वामी यांच्या भविष्य अंकाचे नुकतेच प्रकाशन झाले.

रहाटणी येथे झालेल्या कार्यक्रमात श्रमरोजगार मंत्रालयाचे माजी अध्यक्ष व खादी ग्रामोद्योगाचे उपसभापती डॉ. हेमंत तापकीर यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रावराणे, मुख्याध्यापिका गीता पिल्ले, ॲड. शुभम रावडे, पत्रकार, ज्योतिषशास्त्री उमेश स्वामी आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.

Shiv Sena Symbol : शिंदे गटाचाही त्रिशूल आणि उगवत्या सूर्यावर दावा; आयोगाने दोन्ही चिन्ह केले बाद

डॉ. हेमंत तापकीर यांनी भविष्य अंकाचे (Rahatani News) कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भविष्य अंक दरवर्षी सातत्याने प्रकाशित होत असतो. अंकाच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच अंकाच्या माध्यमातून स्वामी विजयकुमार सामाजिक प्रबोधनही करत असतात, असेही ते म्हणाले. शुभम रावडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.