Rahatani: ट्रान्सपोर्टींगचा बिजनेस  असल्याचे सांगून कंपनीची साडे पाच लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ट्रांसपोर्टिंग बिजनेस असल्याचे सांगून कंपनीची (Rahatani)साडेपाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तरुणावर  वाकड  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही फसवणूक 27 मार्च ते 22 मे 2023 या कालावधीत रहाटणी येथे गिता कॅरिंग कॉर्पोरेशन येथे घडली आहे.
याप्रकरणी प्रितम प्रकाश बऱ्हाणपूरकर (वय 39 रा. काळेवाडी) (Rahatani)यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून धर्मेंद्रकुमार काशिनाथ झा (वय 35 रा.चेन्नई) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीसाठी ऑपीस भाड्याने घेवून ट्रक भाड्याने लावले आहेत असे खोटे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करत गाड्यांचे अडव्हान्स पेमेंट म्हणून 5 लाख 47 हजार 446 रुपये घेवून फिर्यादीची फसवणूक केली आहे. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.