Bhosari :शिवपुत्र संभाजी’ महानाट्याला उदंड प्रतिसाद ; आज शेवटचा प्रयोग

एमपीसी न्युज – ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याला भोसरीतील(Bhosari ) शिव-शंभू प्रेमी जनतेने उदंड व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आज या महानाट्याचा अखेरचा दिवस असून ही सुवर्णसंधी सोडू नका, जास्तीतजास्त नागरिकांनी हे महानाट्य पाहावे असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.

भोसरी येथील गावजत्रा मैदानावर सुरू (Bhosari )असलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याला दर दिवशी सुमारे 25 ते30 हजार नागरिकांनी उपस्थिती लावून स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास पाहिला. विशेष म्हणजे प्रयोग संपल्यानंतर भारावलेल्या प्रेक्षकांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या खासदार डॉ. कोल्हे यांना भेटण्यासाठी प्रचंड रीघ लागते. छत्रपती शंभुराजांचा खरा इतिहास पाहायला मिळाला याबद्दल प्रेक्षक विशेषतः माता-भगिनी डॉ. कोल्हे यांचे आभार मानत असल्याचे पाहायला मिळते.

Khed: आईच्या जमिनीचा हिस्सा दे म्हणत शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण

संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून दि. 22 ते 25फेब्रुवारी या कालावधीत ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे आयोजन केले आहे. शिव-शंभूंचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत. छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे या भावनेतून या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या महानाट्याला रोज होणारी प्रचंड गर्दी पाहता त्यांचा हा संकल्प सफल होत असल्याचे दिसून येते.

ज्या भोसरीकरांना शिवपुत्र संभाजी महानाट्याचा पास (प्रवेशिका) मिळालेला नाही त्यांनी 23आणि 24 फेब्रुवारी सायंकाळी 5.30 वाजता गावजत्रा मैदान येथे यावे आणि स्वयंसेवकांशी संपर्क साधावा. विनाप्रवेशिका सर्वांना प्रवेश दिला जाईल. आपण सर्वांनी ह्या महानाट्याचा सहकुटुंब लाभ घ्यावा ही विनंती. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा विचार घरोघरी पोहचवण्यासाठी संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना मदत करा.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.