Tahthwade : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी पदाधिकारी मेळावा

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीच्या(Tahthwade) पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे  यांच्या उपस्थितीत उद्या (रविवार)  पार पडणार आहे, अशी माहिती  शहरप्रमुख  सचिन भोसले यांनी दिली.

ताथवडे येथील औंध रावेत रोडवरील सिल्वर बँक्वेट (Tahthwade)हॉल येथे रविवारी सायंकाळी 4 वाजता हा मेळावा होणार आहे. पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर,  मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार,  संपर्क प्रमुख लतिका पाष्टे, राज्य संघटक एकनाथ पवार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, अनिता तुतारे, शहर युवा अधिकारी चेतन पवार, उपजिल्हाप्रमुख वैशाली मराठे, निलेश मुटके, धनंजय आल्हाट, तुषार नवले, अनंत कोऱ्हाळे, रोमी संधू, हाजी मणियार दस्तगीर, डॉ. वैशाली कुलथे, कल्पना शेटे, तुषार नवले, मिनल यादव आदींसह पक्षाचे उपशहरप्रमुख, संघटक, उपसंघटक, सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक या मेळाव्य़ास उपस्थित राहणार आहेत.
Bhosari :शिवपुत्र संभाजी’ महानाट्याला उदंड प्रतिसाद ; आज शेवटचा प्रयोग

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर  लोकसभा निवडणुकीसंदर्भात मावळ लोकसभा मतदारसंघातील पदाधिका-यांशी पक्षाचे प्रमुख नेते संवाद साधणार आहेत. प्रमुख पदाधिका-यांकडून कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील उपशहरप्रमुख, संघटक, उपसंघटक, सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन शहरप्रमुख भोसले यांनी केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.