Shiv Sena Symbol : शिंदे गटाचाही त्रिशूल आणि उगवत्या सूर्यावर दावा; आयोगाने दोन्ही चिन्हे केली बाद

एमपीसी न्यूज : काल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे (Shiv Sena Symbol) त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांचा दावा केला होता. तर, शिंदे गटाने आता यातील उद्धव ठाकरे यांचे प्रिय असे त्रिशूल आणि उगवत्या सूर्यावर दावा केला. हा वाढता वाद पाहता निवडणूक आयोगाने हे दोन्ही चिन्ह बाद केले. 

Ajit Pawar : ….कारण मी गद्दार नाही; वाचा अजित पवार असं का म्हणाले?

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर इतर (Shiv Sena Symbol) चिन्हांचा दावा शिंदे आणि ठाकरे गटाने केला होता. पण, आता शिंदे गटाने नवी चाल चालल्याने ठाकरे गटाकडे पुन्हा नाराजीचे सुर उमटले आहेत. एवढेच नव्हे तर शिंदे गटाने शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावावरही दावा केला आहे. आता निवडणूक आयोग हे नाव देखील बाद करेल का? आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोग काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.