Akurdi : आकुर्डीत सापडला तरुणाचा मृतदेह

एमपीसी न्यूज : आकुर्डी गावठाण (Akurdi) परिसरात काल रात्री एका तरुणाचा मृतदेह सापडला अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली. प्राथमिक माहितीप्रमाणे, मृत तरुणाचे नाव मोहन प्रसाद बंसराज गौतम असून त्याचे वय 35 वर्ष होते.
 याबाबत अधिक माहिती देताना, रंगनाथ उंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणाले की, त्याचा मृतदेह आकुर्डीतील उर्दू शाळेच्या मागे (Akurdi) असलेल्या हॉटेलसमोर रात्री 11.45 वाजेच्या सुमारास मिळाला होता. तो मृतदेह मोहन बंसराज प्रसाद गौतम या 35 वर्षे तरुणाचा होता. तो भांगरवाडी, ज्ञानेश्वर कॉलनी, आकुर्डी येथील रहिवासी होता. काल रात्री तो व त्याचा एक परिचित तरुण महेश खाडे यांच्यामध्ये किरकोळ शिवीगाळ झाली होती. त्यानंतर महेश खाडे याने त्या तरुणास धक्का दिल्यामुळे तो मागे असलेल्या पोलवर पडला. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या. मृतदेहावर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल (वायसीएम) रुग्णालयात शव  विच्छेदन करण्यात आले होते.

या प्रकरणी महेश खाडे रा. बिजलीनगर, चिंचवड याला अटक करण्यात आले आहे. तसेच त्याच्या विरोधात भादवि कलम 304 अन्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस त्याबाबत अधिक तपास करत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=xMs1VlvHJZg&t=1s

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.