FSAI : पुण्यामध्ये फायर आणि सिक्युरिटी या विषयावर चर्चासत्राचे आयोजन

एमपीसी न्यूज – लोकांमध्ये आग प्रतिबंध आणि सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृतीच्या उद्धेशाने फायर अँड सिक्युरिटी असोशिएशन ऑफ इंडीया (FSAI) पुणे चाप्टरच्या वतीने पुण्यामध्ये इंडियन फायर अँड सिक्युरिटी यात्रा म्हणजेच फायर आणि सिक्युरिटी या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सुवर्ण महोत्सव वर्षात पदार्पण करणारे व्हीके ग्रुपचे संस्थापक व ज्येष्ठ आर्कीटेक्ट विश्वास कुलकर्णी, एफएसएआय राष्ट्रीय अध्यक्ष अजित राघवन, सुरेश मेनन, अग्निशमन अधिकारी पातरुडकर, एफएसएआय पुणे अध्यक्ष नितीन जोशी, सचिव अर्चना गव्हाणे, अजित यादव, अमोल उंबरजे, पूजा गायकवाड, दादासाहेब गायकवाड, सुजल शहा शेठ, शशांक कुलकर्णी, सिंपल जैन, आनंद गाडेकर, अनुजा करहू, शाश्वता जोशी, किशोर महेश आदी उपस्थित होते.

बॅंकींग क्षेत्रातील सुरक्षा (FSAI) आणि उपकरणे, हॉटेल, लॉजिंग, केटरिंग, महिला सुरक्षा, प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातील अग्निसुरक्षा आव्हाने, आधुनिक काळातील महिलांची सुरक्षा, ई-वाहनांची सुरक्षिता इत्यादी विषयांवर चर्चासत्र यावेळी पार पडले.

रशीदा शब्बीर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, रोहित श्रीवास्तवा, महेश गव्हाणे, अरविंद मांडके, माधव जोशी, जॉन अब्राहम, आसमा शेख,श्वेता दरगड, अंशु शुक्ला, निलेश गांधी, डॉ त्रिशला राणे, तरुणेश माथूर, महेश लिमये, मिलिंद पनदारे, रवी नायर, समीर बुवा व डॉ. दीपक शिकारपुर इत्यादी तज्ञ चर्चासत्रात सहभागी होते.

Lions Club : लायन्स क्लबच्या वतीने देशी वृक्षारोपण

तसेच विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राची ओळख होण्यासाठी व प्रगत तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी फायर अ‍ॅंड सिक्युरीटी असोशिएन ऑफ इंडिया (विद्यार्थी विभाग) व स्कुल ऑफ आर्किटेक्ट यांच्यात सामंजस्य करार या वेळी करण्यात आला. या करारामुळे विद्यार्थायांना शिक्षण सुरु असतानाच औद्योगिक क्षेत्राची ओळख होण्याबरोबर भविष्यात अधिक चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या कार्यक्रमासाठी राणेंक्स, जीयेसटी, फायर टेक, लाईव्ह वायर, किर्लोस्कर ब्रदर्स, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, अल्फा ब्लोवर्स, मुप्रो, अरमासेल इत्यादी कंपन्यांनी विविध प्रायोजक म्हणून सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.