Lions Club : लायन्स क्लबच्या वतीने देशी वृक्षारोपण

एमपीसी न्यूज : लायन्स क्लब (Lions Club) ऑफ पुना निगडी आणि लायन्स क्लब ऑफ वडगाव यांच्या वतीने देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. ऑक्टोबर सेवा सप्ताहाचे औचित्य साधून दोन्ही क्लबच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
लायन्स क्लब ऑफ पुना निगडी आणि लायन्स क्लब ऑफ वडगांव यांच्या वतीने गोपाळ नवजीवन केंद्राचे कै. गोपाळराव देशपांडे वनवासी विद्यार्थी वसतिगृह येथे देशी वृक्षांचे वृक्षारोपण संपन्न झाले.
ऑक्टोबर सेवा सप्ताहाचे औचित्य साधून कडूनिंब, वड, पिंपळ, चिंच, आपटा, जांभूळ असे सुमारे १५ विविध देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

वसतिगृहाचे कार्यवाह (Lions Club) दिलीपराव देशपांडे, लायन्स क्लब ऑफ पुना निगडीचे संचालक कॅबिनेट अधिकारी प्रा.राजीव कुटे, संचालक अजित देशपांडे, लायन्स क्लब ऑफ वडगावचे सचिव योगेश भंडारी, खजिनदार नंदकिशोर गाडे, संचालक आणि पंचायत समितीचे मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर, बाळासाहेब बोरावके,  नगरसेवक भूषण मुथा, वसतिगृहाचे अधीक्षक सोमनाथ वैद्य, सामाजिक कार्यकर्ते सतीश आगळे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम संपन्न झाला.
वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या सर्व वृक्षांचे पालकत्व स्वीकारले आहे. दिलीप देशपांडे, सचिव योगेश भंडारी, राजीव कुटे यांनी मनोगताद्वारे या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन कॅबिनेट अधिकारी भूषण मुथा यांनी केले.

आभार प्रदर्शन बाळासाहेब बोरावके यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.