Pimpri : ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची हार्नेक्स कारखान्याला भेट

एमपीसी न्यूज – भावी आयुष्यात विद्यार्थ्यांना  (Pimpri ) तांत्रिक ज्ञान अवगत होण्यासाठी ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूल आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकाससाठी शाळेने या अंतर्गत विविध उपक्रम राबवत असते. त्याअतंर्गत शनिवारी (दि.20) ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हार्नेक्स कारखान्याला भेट दिली.

औद्योगिक भेट ही शिकवण्याच्या सर्वात रणनीतिक पद्धतींपैकी एक मानली जाते. हे विद्यार्थ्यांना परस्परसंवाद, कामाच्या पद्धती आणि रोजगार पद्धतींद्वारे व्यावहारिकपणे शिकण्याची संधी प्रदान करते.नियोजनानुसार ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलच्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी एमआयडीसी औद्योगिक परिसरात असलेल्या हार्नेक्स कारखान्याला भेट दिली. लायन अशोक येवले यांनी कारखान्याला भेट देण्यापूर्वी विद्यार्थ्यांना हार्नेसबाबतच्या मूलभूत मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.

Pune : रविंद धंगेकर यांना भाजपमध्ये येण्याची संजय काकडे यांच्याकडून ऑफर

फॅक्टरीमध्ये एचआर विभागाचे प्रमुख प्रदीप यांनी त्यांच्या टीमसह विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागाची माहिती दिली. फॅक्टरीत कच्च्या मालाची आवक, तारांचे स्टॅम्पिंग आणि क्रिमिंग, हार्नेसचे उत्पादन, उत्पादनाची गुणवत्ता तपासणे, अंतिम (Pimpri ) उत्पादनांचे पॅकिंग कशाप्रकारे होते याची माहिती देण्यात आली. विद्यार्थी नवीन कौशल्ये शिकण्यासाठी खूप उत्साही होते आणि त्यांनी हार्नेक्स टीमला शंका विचारल्या.

ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या विद्युत सहारे यांनी विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये शिकण्याची संधी व व्यासपीठ दिल्याबद्दल संघाचे व अशोक येवले सरांचे आभार मानले. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार भविष्यात सर्वोत्तम करिअर निवडण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.