Rajgurunagar : कॅनव्हासवरील पुलंच्या चित्राने रसिक मंत्रमुग्ध

चित्रकार सचिन जुवाटकर यांनी रंगवले पुलंचे चित्र

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्यावरील प्रेम आजही कमी झालेले नाही. राजगुरूनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या पु. ल. एक चित्रकाव्य तसेच साहित्य व काव्य वाचन कार्यक्रमामध्ये याचा प्रत्यय आला. या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांनी रंगवलेलं पु. ल. देशपांडे यांचे चित्र सर्वांचे आकर्षण ठरले. उद्योजक रोहित खर्गे यांनी त्यांच्या साई शिवनेरी हॉटेलमध्ये प्रजासत्ताकदिनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले, नारायण सुर्वे कलाकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, सुमनताई भोंडवे, पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, अनिल कातळे, सचिन चपळगावकर, भाऊसाहेब कराडे, संदीप कानडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य शारदाताई शिंदे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात चंद्रकांत वानखेडे, राजेंद्र वाघ यांनी काव्यवाचन केले. या कार्यक्रमाच्या दरम्यान सुप्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांनी पु. ल. देशपांडे यांचे तैलचित्र रंगवून उपस्थितांना चकित केले. या कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.