Pune : विठ्ठल नामाच्या जयघोषात संत तुकाराम महाराज पालखीचे शहरात आगमन

एमपीसी न्यूज – विठ्ठल-विठ्ठल, विठ्ठला हरी ओम विठ्ठलाच्या नामघोषात संत तुकाराम महाराज पालखीचे पुण्यात आगमन झाले आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज शनिवारी सकाळी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरातून पुण्याकडे प्रस्थान केले होते. तर थोड्याच वेळात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी देखील पुण्यात दाखल होणार आहे.

ज्ञानबा-तुकाराम, विठू माऊलीच्या जयघोषात पुण्यातील संचेती हॉस्पिटलजवळच्या चौकात संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन झाले. यावेळी महापौर आणि आमदार विजय काळे यांनी पुष्पगुच्छ देऊन पालखीचे स्वागत केले. दरम्यान, पालखीच्या स्वागतासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी संचेती चौकात कडेकोट सुरक्षा ठेवली होती. ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. दरम्यान, पालखीच्या आगमनानंतर भिडे गुरुजींनी काही क्षण पालखीचे सारथ्यही केले. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.