Pune : पोलिसांच्या नोटिशीनंतरही भिडे गुरुजी वारीत सहभागी होण्यासाठी सज्ज

एमपीसी न्यूज – संभाजी भिडे गुरुजींनी धारकऱ्यासह पालखी सोहळ्यात मध्येच घुसू नये यासाठी पोलिसांनी त्यांना यापूर्वीच नोटीस बजावली आहे. परंतु संभाजी भिडे आणि त्यांचे शेकडो धारकरी वारीत सहभागी होण्यावर ठाम आहेत. वारीत सहभागी होण्यासाठी शेकडो धारकऱ्यासह भिडे गुरुजी संचेती हॉस्पिटलसमोरील रुग्णालयासमोर जमा झाले आहेत. याठिकाणी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनीही मोठा बंदोबस्त लावला आहे.  

तत्पूर्वी भिडे गुरुजींनी जंगली महाराज मंदिरात शेकडो धारकऱ्यांना संबोधित केले आहे. वारीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह राज्यासह कर्नाटकातूनही अनेक धारकरी आले आहेत. मागील वर्षी भिडे गुरुजींच्या पालखी सोहळ्यातील सहभागावरून मोठा वाद झाला होता. त्यावेळी संभाजी भिडे यांच्यासह शिवप्रतिष्ठानच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.