Sangvi : व्हिडिओ कॉलद्वारे महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – अज्ञात मोबाईल धारकाने महिलेला व्हिडीओ कॉल करत अश्‍लिल वर्तन करुन तरुणीचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि.18) दुपारी दीडच्या सुमारास सांगवी परिसरात घडली.

याप्रकरणी 46 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेला एका क्रमांकावरुन अज्ञात इसम व्हॉटसऍपवर एसएमएस करत होता. त्याने रविवारी दुपारी दीडच्या सुमारा व्हॉटसऍपवर व्हिडीओ कॉल केला. पिडीतेने तो उचलला. यावेळी त्याने कॉलवरच पिडीतेशी अश्‍लिल वर्तन केले. यामुळे पिडीत महिलेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत मोबाईल धारकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. याचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत. पोलिसांनी महिलांना आवाहन केले आहे की, अनोळखी मोबाईल क्रमांक, फेसबुक, व्हाट्स अप यांसारख्या सोशल मीडियावर महिलांनी त्यांची कोणतीही खासगी माहिती टाकू नये. आपल्या खासगी माहितीचा गैरवापर केल्याचा संशय येताच संबंधित व्यक्तीला ब्लॉक करावे आणि पोलिसांशी संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.