Pune : मुक्तांगण इंग्लिश स्कूलच्या संचालकाविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दहा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुक्तांगण (Pune)  इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे संचालक राजेंद्र संपत कांबळे (वय 53) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलीची आजीला कामावरून काढून टाकण्यात आले होते. 27 जुलै रोजी पीडित मुलगी आजी सोबत जात असताना आरोपीची कार सारसबागेजवळील सिग्नल जवळ थांबली होती. त्यावेळी पीडित मुलीच्या आजीने हात जोडून मला कामावर घ्या अशी विनंती त्याच्याकडे (Pune) केली.

त्यावेळी आरोपीने खिडकीतून हात बाहेर काढत फिर्यादीचा गाल ओढला, पाठीवरून हात फिरवत आजीकडे बघून नात मोठी झाली आहे ,यानंतर घेऊन तिला असे म्हणाला. मला भेटायला आता जमणार नाही, भेटायचे असेल तर संध्याकाळी एकटी या मी तुम्हाला संध्याकाळी टायमिंग सांगतो असे म्हणाले , असे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू (Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.